चंद्रपूर – कोरोनाचा काळ नागरिकांच्या जीवनात अंधकार घेऊन आला, 1 नागरिक बाधित झाल्याने आज देशात 90 लाखांच्यावर एकूण बाधितांची संख्या पोहचली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात ही संख्या 19 हजारांच्या वर पोहचली असून दररोज 100 ते 200 बाधितांची भर पडत आहे.
पॉझिटिव्ह असो की संस्थात्मक विलीगिकरण त्यामध्ये नागरिकांना आरोग्य उपचार देण्याचं काम डॉक्टर्स आपल्या परीने करीत आहे मात्र रुग्णांना जेवणासंबंधीच्या तक्रारी खूप होत असून यावर प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
23 नोव्हेम्बरला वनराजीक महाविद्यालयाच्या कोविड सेंटर मधील रुग्णाला अळीयुक्त जेवण दिल्याने तो रुग्ण जाम घाबरला व न जेवता याची तक्रार संबंधितांना दिली.
जेव्हा ही बाब मनसे शहर अध्यक्ष मंदीप रोडे यांना कळली असता त्यांनी यावर चांगलाच संताप व्यक्त केला.
निकृष्ट अन्न रुग्णांना देत त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार तात्काळ थांबवा अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर देऊ असा सज्जड इशारा सुद्धा रोडे यांनी यावेळी दिला.
रुग्ण आधीच कोरोनापासून धास्तावलेला असतो आणि रुग्णांना निकृष्ठ प्रकारचे जेवण देण्यात येत आहे, याप्रकारच्या जेवणामुळे रुग्ण नैराश्य भावनेत जगत असून त्यांच्या जीवाचं काही बरे वाईट झाल्यास याला जबाबदार प्रशासन व कंत्राटदार असेल अशी प्रतिक्रिया रोडे यांनी दिली आहे.
कोरोना बाधित रुग्णांच्या जेवणात मिळाल्या अळ्या
Advertisements