भाजपच्या रक्तदान कार्यक्रमात “एक होता कोरोना पॉझिटिव्ह”

0
1214
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता

घुगूस – भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त घुगूस शहरात भव्य रक्तदान शिबिर सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचा फज्जा उडवीत आयोजित करण्यात आले होते.
नागरिकांची अफाट गर्दी व विक्रमी रक्तदान म्हणजेच 719 नागरिकांनी स्वेच्छा रक्तदान केले मात्र या कार्यक्रमातच 1 पदाधिकारी हा कोरोना बाधित असल्याचे 2 दिवसांनी निष्पन्न झाले आहे.
हा पदाधिकारी रक्तदान कार्यक्रमात पूर्णवेळ उपस्थित होता, घुगूस भाजपने कोरोना काळात शासनाचे अनेक नियम पायदळी ठेवले, नागरिकांना कोरोनापासून बचाव करा असा संदेश एकीकडे तर दुसरीकडे त्या सर्व नियमांचा फज्जा उडविण्याची भाजपने जणू साखळीच सुरू ठेवली होती.
आता भव्य रक्तदान कार्यक्रमात 1 पदाधिकारी बाधित असल्याने तो किती लोकांच्या संपर्कात आला असेल याची कुणालाही कल्पना नाही, आणि महत्वाचे म्हणजे जर त्याने रक्तदान केलं असेल तर परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकते असे झाल्यास घुगूस शहरात भीतीचे वातावरण पसरू शकते.

Advertisements

सध्या आयोजकांच्या गोटात कमालीची चिंता वाढली आहे.
नियम फक्त नागरिकांसाठी पक्षासाठी नाही या प्रत्ययावरून समजते.
घुगूस भाजपचं नेहमी बेजबाबदार पणाने काम करीत असेल, शासनाच्या नियमांचा नेहमी फज्जा उडवून यांना करायचं तरी काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here