ओबीसी बांधवांच्या संवैधानिक हक्कासाठी “आता नाही तर कधीच नाही”

0
253
Advertisements

चंद्रपूर – 26 नोव्हेंबर संविधान दिन या महत्वाच्या दिनी चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसी जनतेचा महामोर्चा निघणार आहे.
देशातील बहुसंख्य असलेला मूळ निवासी समाज हा ओबीसी आहे, त्याकाळात साधन सामुग्रीचा अभाव होता म्हणजेच इंग्रजांच्या काळात त्यावेळी ओबीसींची स्वतंत्र जनगणना झाली होती.
मात्र आज सर्व साधने उपलब्ध असताना सुद्धा आजपर्यंत एकाही सरकारने ओबीसी जनगणनेसाठी पुढाकार घेतला नाही.
हा ओबीसींना हक्क व अधिकारापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे. ओबीसींना संवैधानिक अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी जनगणना आवश्यक आहे, शासनावर 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसींचा वेगळा रकाना हवा यासाठी 26 नोव्हेम्बरच्या महामोर्चात लाखोंच्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन ओबीसी महामोर्चा आयोजक डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी केले आहे.
ओबीसी हा बारा बलुतेदार, अठरा अलुतेदार कारूनारू यांचा समाज आहे, हातात नानाविध कौशल्ये व अंग मेहनतीची तयारी असलेला हा समाज एकूण 3 हजार 743 जातीत विभागल्या गेला आहे.
जातीनिहाय जनगणना झाल्यास व त्यामध्ये ओबीसींचा वेगळा रकाना उपलब्ध करून दिल्यास ओबीसींचे शिक्षण, आरोग्य, गरिबी, रोजगार निवारा याविषयीची माहिती जमा करणे सहज होणार, त्या माहितीच्या आधारे ओबीसींच्या समकालीन जीवनमानाचे स्वरूप समजणार.
देशात आज ओबीसींची संख्या किती आहे? कारण इंग्रजांच्या काळात ओबीसींची संख्या ही 54 टक्के होती मात्र आरक्षण त्यावेळी 27% मिळाले होते.
मात्र आज देशात एकूण ओबीसींची संख्या काय हे जेव्हा पूर्णपणे समजणार त्यावेळी ओबीसींसाठी कल्याणकारी योजना राबविता येणार, मात्र त्यासाठी जनगणनेत ओबीसींचा रकाना देऊन ओबीसी समाजाला न्याय देण्यात यावा.
जनगणनेच्या मुद्द्यावरून ओबीसी समाज पेटून उठला आहे, उद्याचा मोर्चा हा नेतृत्वक्षमता नाही तर ओबीसींच्या हक्काचा आहे.
ओबीसींच्या या संवैधानिक लढ्यात सर्व ओबीसी बांधवांनी लाखोंच्या संख्येत येऊन आपली उपस्थिती दर्शावी असे आवाहन ओबीसी महामोर्चा आयोजक डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here