भांडणात मध्यस्ती करणे महिलेला पडले महागात

0
423
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता

घुगूस – घुग्गुस जवळच्या नकोडा येथील अरुणा सफरजित पासवान (29)रा. नकोडा ही महीला घरी असताना आरोपी हरीदास बबन वानखेडे रा नकोडा हा मंगळवारच्या सकाळी १०:३० वाजता दरम्यान महिलेच्या घरात घुसुन अश्लील शिविगाळ करून भाजीपाल्याच्या चाकुने हातावर वार केला व तिच्या सात वर्षीय लहान बालकाच्या गालावर चाकुन वार करून गंभीर जखमी केले.

Advertisements

महिलेने आरडाओरडा केला असता नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली. जखमी अवस्थेत बालकास व महिलेला प्रा.आ.केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले फिर्यादी महिलेच्या तक्रारी वरुन कलम ४५२,३२३,३२४, ५०४ व ५०६ कलमानवये पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आरोपी हल्ला करून फरार झाला आहे, घुगूस पोलीस त्याचा शोध घेत आहे, हल्ल्याच कारण म्हणजे  दोन दिवसांपूर्वी आरोपी हरिदास वानखेडे यांचं आपल्या आईशी भांडण झाले होते, मात्र हे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी अरुणा हिने मध्यस्ती करून आरोपीच्या आईला घरी ठेवले, या कारणचा राग आरोपी हरिदास ने मनात ठेवला होता.

भांडणाची मध्यस्ती करणे अरुणाला महागात पडले, तिच्यावर व 7 वर्षाच्या चिमुकल्यावर हरिदास ने चाकूने हल्ला करून जखमी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here