तहसीलदारांचे रिक्तपद त्वरित भरा – प्रहारची मागणी

0
512
Advertisements

वरोरा :- दोन महिन्यांपूर्वी वरोरा तहसील कार्यालयाचे तहसीलदार सचिन गोसावी यांची बदली झाल्यानंतर पद रिक्त होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही नवीन तहसीलदार यांची नियुक्ती न केल्याने शेतकऱ्यांचे अनेक कामे खोळंबलेली आहे .या विषयाला घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहार सेवक आशिष घुमे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले .

सध्या वरोरा तहसील कार्यालय येथे तत्कालीन तहसीलदार सचिन गोसावी पदमुक्त झाल्यापासून भद्रावती येथून बदलून आलेले नायब तहसीलदार काळे यांच्या कडे प्रभारी म्हणून काम बघत आहे .पूर्ण अधिकार त्यांच्याकडे नसल्याने व काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे .तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे फेरफार व ऑनलाइन सातबारा असे विविध कामे खोळंबलेली आहे. करिता त्वरित नियमित तहसीलदार यांची नियुक्ती करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आंदोलन पुकारण्यात येईल . असा इशारा ही निवेदनातून देण्यात आला .यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे. प्रहार सेवक आशिष घुमे , शेरखान पठाण , जगदीश लांडगे , महेश त्रिवेदी , मुज्जमिल शेख , प्रमोद देठे , देवा पांडे , ओंकार कांबळे .तसेच इतर प्रहार सेवक उपस्थित होते .

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here