Advertisements
पोंभूर्णा – चिंतलधाबा येथील विनोद थेरे यांच्या कार (MH-34 BF- 5953)ला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सोनापुर फाट्याजवळ स्कार्पीओ गाडीने अपघात झाला.पोंभूर्णा पोलिस द्वारा घटनास्थळावरून जेशिबी मशिनच्या साहाय्याने पोलिस ठाण्यात नेत असताना दुपारी सुमारे १.३० वाजताच्या दरम्यान चिंतामणी काॅलेज जवळ कार ने अचानक पेट घेतला.
चिंतामणी काॅलेजातील फाॅयर बंबच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो प्रयत्न अयशस्वी झाल्याने मुल आणि बल्लारपुर अग्निशामक दलाला सुचना देण्यात आल्या. दोन्ही ठिकाणच्या अग्निशामक गाड्या घटनास्थळावर पोहचे पर्यंत कार जळून खाक झाली होती. पोंभूर्णा नगर पंचायतची अग्निशामक गाडी मंगळवारी दुरूस्तीला गेल्याने ती उपयोगी पडू शकली नाही. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही.