पदवीधर निवडणुकीच्या धर्तीवर गडचांदूरात महिला आघाडीची बैठक

0
298
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
येत्या 1 डिसेंबर रोजी पदवीधर मतदार निवडणूक होणार असून भाजपने संदीप जोशी यांना उमेदवारी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर 24 नोव्हेंबर रोजी नागपूरच्या माजी महापौर तथा भाजपा प्रदेश सरचिटणीस सौ.अर्चना डेहानकर यांच्यासहा प्रदेश उपाध्यक्ष सौ.वनीता कानळे,चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा कु.अल्का आत्राम हे प्रचारासाठी गडचांदूरात आले असता सर्वप्रथम भाजपा महिला आघाडीतर्फे यांचे शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

पदवीधर मतदार निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून तेव्हा आपण मतदार यादीचे वाचन करून त्या मतदाराकडे जाऊन आपल्या उमेदवारासाठी मत मागावे आणि निवडून देण्यासाठी अथक प्रयत्न करावे असे आवाहन प्रदेश सरचिटणीस अर्चना देहानकर यांनी केले. यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित महिला आघडीच्या सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे, सचिव सौ.रंजना मडावी व सौ.इंदिरा कोल्हे यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी नवनिर्वाचितांसह सौ. सपना सेलोकर, श्रीमती शांताबाई मोतेवाड,सौ.शीतल धोटे, सौ.बोरीकर,सौ. इंदिरा कोल्हे,पोंभूर्णा नगराध्यक्षा सौ. बनकर, उपनगराध्यक्षा रजी़या कुरेशी, सुनीता मेकलवार,गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार, जेष्ठ नेते शिवाजी सेलोकर,निलेश ताजने, नगरसेवक अरविंद डोहे, नगरसेवक रामसेवक मोरे, गजानन शिंगरू, महेश घरोटे,गजानन चिरडे, संदीप शेरकी, गणपत बुरडकर,सुधाकर बोरीकर,अरविंद कोरे आदी भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मोठ्यासंख्यने उपस्थिती होती.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here