1 जानेवारीपासून देशवासियांना पडणार “शून्याची” गरज

0
697
Advertisements

ताजी बातमी – नववर्षाच्या पहिल्या म्हणजेच 1 जानेवारीपासून लँडलाईन मोबाईलवर आपला कॉल कनेक्ट होणार नाही कारण ग्राहकांना 1 जानेवारीपासून मोबाईल क्रमांक आधी शून्य लावणे अनिवार्य होणार आहे.
त्यासाठी शून्य डायल केल्यावरच आपला कॉल मोबाईल सह कनेक्ट होणार, दूरसंचार विभागाने सुद्धा ट्रायच्या या नियमाला मान्यता दिली आहे.
दूरसंचार विभागाने याबाबत 20 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या पत्रकानुसार माहिती दिली की, लँडलाईन वरून मोबाईलवर नंबर डायल करण्याच्या पद्धतीत बदल करण्याचा ट्राय चा निर्णयाला आम्ही मान्यता दिली असून मोबाईल आणि लँडलाईन सेवांसाठी पुरेशा प्रमाणात नंबर देण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध होणार असल्याचे त्या परिपत्रकात नमूद आहे.
ही सुविधा 1 जानेवारीपासून सर्व देशात लागू केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here