वरोरा – महारोगी सेवा समिती आनंदवन बाबा आमटे यांनी वर्ष 1949 रोजी स्थापन केलेली देशातील अग्रणी सेवाभावी संस्था आहे.
या समितीच्या सेवाकार्याचा डंका साता समुद्रापार वाजला आहे, आनंदवन मधील सेवाकार्य बघण्यासाठी विदेशातून अनेक मान्यवरांनी भेट दिली आहे.
आनंदवन असेल की लोक बिरादरी प्रकल्प, सोमनाथ व इतर बहुविध सेवा प्रकल्पाद्वारे समाजाची सेवा करीत आहे.
मात्र आमटे कुटुंबातील सदस्य डॉ. शीतल करजगी (शीतल विकास आमटे) यांच या सेवकार्यात महत्वाचं योगदान आहे.
मात्र सध्या डॉ. शीतल करजगी मानसिक ताण व नैराश्याला सामोरे जात आहे त्यांनी याबाबत तशी कबुली सुद्धा समाज माध्यमातून दिली आहे.
मात्र त्यांनी अलीकडे महारोगी सेवा समिती संस्थेच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल व कार्यकर्त्यांबद्दल अनुचित वक्तव्ये केली, त्यांच भाष्य पूर्णपणे तथ्यहीन आहे, शीतल करजगी यांच्या कोणत्याही वक्तव्यांमुळे समाजात कोणताही गैरसमज होऊ नये यासाठी महारोगी सेवा समितीचे डॉ. विकास आमटे, भारती आमटे, डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी संयुक्तरित्या निवेदन देत मागील 7 दशकापासून परंपरेला अनुसरून सेवा करीत आहो व पुढेही करीत असल्याची ग्वाही दिली.
सध्या समाजात पसरत असलेल्या कोणत्याही अपप्रचारावर विश्वास न ठेवण्याची विनंती सुद्धा विश्वस्तांनी केली आहे.
डॉ. शीतल आमटे यांच्या वक्तव्याशी आमटे परिवाराने वर्तवली असहमती
Advertisements