आचारसंहितेमुळे डिसेंबर महिन्याचा लोकशाही दिन स्थगित

0
170
Advertisements

चंद्रपूर : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असते. परंतु नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर निवडणूक 2020 चा कार्यक्रम दि.2 नोव्हेंबर 2020 पासून दि. 7 डिसेंबर 2020 पर्यंत असल्यामुळे नागपूर विभागात आदर्श आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे माहे डिसेंबर 2020 या महिन्यातील पहिल्या सोमवारी आयोजित लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही.

शासन परिपत्रक दि.26 सप्टेंबर 2012 मधील मुद्दा क्र.5.7 मधील नमूद तरतुदीनुसार ज्या क्षेत्रामध्ये निवडणुकीकरिता आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. अशा ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येऊ नये, असे निर्देश आहे. त्या अनुषंगाने आचारसंहिता कालावधीत माहे डिसेंबर 2020 महिन्याच्या लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नसल्याचे, निवासी उप जिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here