चंद्रपूर – संदीप जोशी हे नागपूर महानगरपालिकेचे महापौर आहेत. लोकप्रतिनिधीत्वाचा दीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. लोकप्रतिनिधीत्वाचे संस्कार त्यांना त्यांच पिताश्रींकडून मिळाले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हाकेला तत्परतेने ओ देणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. हीच ओळख पुढे नेत पदवीधरांचे आमदार म्हणून ते विधान परिषदेत आपले कर्तृत्व सिध्द करतील, असा विश्वास नागपूरच्या माजी महापौर तथा भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव अर्चना डेहणकर यांनी व्यक्त केला.
दिनांक 24 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर शहरात तुकूम परिसरात आयोजित महिला पदवीधरांच्या, नोंदणी प्रमुखांच्या बैठकीत अर्चना डेहणकर बोलत होत्या. या बैठकीला भाजपाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. वनिता कानडे, चंद्रपूर महानगर जिल्हा भाजपा महिला आघाडी अध्यक्षा तथा चंद्रपूरच्या माजी महापौर सौ. अंजली घोटेकर यांनी प्रामुख्याने उपस्थिती होती. विधान परिषदेत आपला कर्तृत्ववान भाऊ निवडून जावा व त्या माध्यमातुन पदवीधर, सुशिक्षीत बेरोजगार भगिनींना न्याय देण्यासाठी सुजाण लोकप्रतिनिधी निवडून जावा यासाठी महिलांनी परिश्रम घेण्याचे आवाहन सौ. अंजली घोटेकर यांनी यावेळी केले. विधान परिषदेचा नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ हा भाजपाचा बालेकिल्ला असून या निवडणूकीत संदीप जोशी यांचा विजय सुनिश्चीत असल्याचे सौ. वनिता कानडे यावेळी बोलताना म्हणाल्या. कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा बोरगमवार तर आभार प्रदर्शन मंजूश्री कासनगोट्टूवार यांनी केले.
याबैठकीला भाजपाचे चंद्रपूर महानगर सरचिटणीस सुभाष कासनगोट्टूवार, महिला मोर्चा सरचिटणीस तथा मनपा सदस्य सौ. शिला चव्हाण, प्रज्ञा बोरगमवार, सपना नामपल्लीवार, उपाध्यक्षा मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रभा गुडधे, सौ. माया मांदाडे, मनपा सदस्य सौ. शितल गुरनुले, सौ. माया उईके, सौ. पुष्पा उराडे, श्री. धर्मपूरीवार, सौ. ज्योती दिनगलवार सौ. वंदना संतोषवार, सौ. पायल लालसरे, सौ. मंजुषा राऊत, सौ. शुभांगी जांभुळकर, सौ. लिना इंगुलवार, सौ. शुभांगी काकडे, सौ. माधुरी वाकडे, सौ. लोखडे, सौ. वर्षा सुरंगळीकर, सौ. वृषाली धर्मपूरीवार, सौ. भारत अवधूत, सौ. नेहा धारणे, धर्माजी खंगार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महामंत्री सौ. शिला चव्हाण, सौ. प्रज्ञा बोरगमवार, सौ. सपना नामपल्लीवार यांनी केले.