दिलेला शब्द पुर्ण करा…..! भाजप आक्रमक

0
166
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले असून याच पार्श्वभूमीवर गेल्या मार्च,एप्रिल,मे या तीन महिन्यात लॉकडाऊन(संचारबंदी) होती.”घरी रहा,सुरक्षित रहा” असे आवाहन शासनाने केल्याने लोक काम धंदे, व्यापार बंद करून घरीच बस्तान मांडून बसले होते.याकाळातील वीजबिल माफ करण्याचा शब्द शासनाने दिला होता.मात्र आता भरमसाठ बिल पाठवून लोकांना वेठीस धरले जात आहे.बिल भरायचे कसे हाच प्रश्न लोकांना पडला असून वीजबिल माफ करा,या मागणीसाठी भाजपच्या वतीने राज्यातील इतर ठिकाणांसह गडचांदूर येथे सुद्धा वीजबिलांची होळी करण्यात आली.
कोरोना काळातील बिलांच्या माफी बद्दलची मागणी भाजपने सतत उचलून धरल्याने राज्य सरकारने वीजबिल माफ करण्याचा शब्द दिला. तसेच 100 युनिटपर्यंत वीजबिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते.परंतु आजतागायत याची पुर्तता करण्यात आली नाही.याउलट वीजबिल माफी नसल्याचे सांगण्यात आल्याने या सरकारने दिलेला आश्वासन पूर्ण न करता राज्यातील जनतेचा सपशेल विश्वासघात केला आहे.या तिघाडी सरकारचा निषेध करत वीजबिल माफ करण्यासाठी भाजपतर्फे सदर आंदोलन करण्यात आले.निषेध करत राज्य सरकारच्या विरोधात गगनभेदी घोषणाबाजी करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी ठाणेदारांना निवेदन देण्यात आले.
भाजप शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार, नगरसेवक अरूण डोहे,निलेश ताजने, लोकतंत्र सैनानी महेश शर्मा,जेष्ठ नेते शिवाजी सेलुकर,हरीष घोरे,भागवत क्रिष्ण,अरविंद कोरे, महेताब शेख,प्रतीक सदनपवार,योगेंद्र केवट,अशोक दरेकर, नामदेव मानकर,सचिन पवार,शेख इम्रान, संदीप शेरकी, बब्लू रासेकर,कुणाल पारखी, गजानन डोंगरे, अभिषेक जोगी,शंकर आपूरकर, हेमंत पातूरकर, अमजद जलील खान, माजी न.प.नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे, अॅड.दिपांजली मंथनवार, सौ.सपना सेलोकर,सौ.संगीता गोरडवार, सौ.रंजना मडावी, त्रीवेणी जगताप यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सदर आंदोलनात मोठ्यासंख्यने उपस्थित होते.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here