कोरपना भाजपतर्फे महाविकास आघाडी सरकारचा निषेध

0
145
Advertisements

 

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुका भाजपा व भाजयुमो तर्फे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा कोरपना येथे जाहीर निषेध करण्यात आला. यामध्ये लॉकडाऊन काळातील नागरिकांना पाठवण्यात आलेले वीजबिल माफ करण्यात यावे,संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी,घरकुलाचा नीधी तात्काळ देण्यात यावा आदी मागण्या निषेध मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आले.यावेळी विजबिलांची होळी करण्यात आली.याप्रसंगी उपस्थितांनी तहसीलदारांना निवेदन दिले.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर,किशोर बावणे,जेष्ठ नेते शिवाजी सेलोकर,विनोद नवले,शशिकांत आडकिने,विजय रणदिवे,नगरसेवक अमोल आसेकर,ओम पवार,दिनेश सुर, दिनेश खडसे,हिरापूरचे माजी सरपंच प्रमोद कोडापे,प्रमोद पायघन,जगदीश पिंपळकर,अभय डोहे, किशोर कारेकर, विजय पानघाटे,अनील कवरासे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सदर आंदोलनात उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here