महाविकास आघाडी म्हणजे बेलगाम सरकार – माजी केंद्रीय राज्यमंत्री अहिर यांचा घनघणात

0
161
Advertisements

चंद्रपूर – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि सरकारने लाॅकडाऊन जाहीर केले. लाॅकडाऊन दरम्यान गोरगरीबांना घराबाहेर जावु नका असे आवाहन करत सरकारमधील प्रत्येक मंत्री गरीबांना न्याय देण्याची भाषा करीत होते. गरीबांना न्याय देणे तर दुरच मात्रा याच लाॅकडाऊनच्या काळातील गरीबांची विजबीले माफ करण्याचे आठवण या सरकारला नाही. महाआघाडी सरकारला हा विस्मरणाचा रोग झाला आहे. जनता आर्थिक अभावामुळे आधिच संकटात असतांना सरकार पून्हा त्यांच्यावर वाढीव विजबीलाचा भार लादुन त्यांना त्रास्त करीत आहे अशी टीका पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली.
चंद्रपूर येथील स्थानीक वरोरा नाका चौकात भाजपातर्फे लाॅकडाऊनच्या काळातील गरीबांची विजबीले माफ करण्याच्या मागणीसाठी ग्रामिण भागातील शेतकरी व ग्रामस्तांच्या उपस्थितीत विजबील होळी आंदोलन करण्यात आले. यावेळी श्री राजु घरोटे, भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर , श्री नरेंद्र जिवतोडे, श्री प्रविन ठेंगने, श्री राजु येले, श्री सचिन डोहे, श्री संजु ढाकने, निलकंठ निखाडे, श्री सुधीर बोढाले, श्री मारोती बोढाले, श्री शंकर बालपने, श्री संदीप निमकर, श्री रवि डोंगे यांच्यासह ग्रामिण भागातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अहीर यांनी ग्रामिण भागात वाढीव विजबिलामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष असुन सरकारने वाढीव विजबिलाची आकारनी रद्द न केल्यास ग्रामस्थांच्या असंतोषाला तोंड द्यावे लागेल आणि भारतीय जनता पार्टीतर्फे हा असंतोष संघटीत करून सरकारला वाढीव विजबिलाची आकारनी रद्द करण्यासाठी अधिक तिव्र आंदोलन करून सरकारला वाढीव विजबिल आकारनी रद्द करण्यासाठी बाध्य केल्यशिवाय राहणार नाही असा इशारा अहीर यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here