वरोरा पोलिसांनी पकडली 12 लाख 20 हजार रुपयांची अवैध दारू

0
660
Advertisements

वरोरा – वरोरा पोलीस स्टेशन हद्दीत बोपापुर शेतशिवारात पोलिसांनी धाड मारली असता त्यामध्ये 12 लाख 20 हजार रुपयांची देशी दारू सहित एकूण 13 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुप्त माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक राजकीरण मडावी, किटे, जावेद, चवरे, बेलसरे व दीपक दुधे यांनी मौजा बोपापुर शेतशिवारात धाड मारून 122 नग खरड्याच्या खोक्यात 90 मिली च्या देशी दारूच्या तब्बल 12 हजार 200 नग निपा आढळून आल्या त्यांची एकूण किंमत 12 लाख 20 हजार तर 2 मोबाईल, 2 दुचाकी वाहन एकूण मुद्देमाल 13 लाख 40 हजार सहित आरोपी 45 वर्षीय शेखर जंगोनी, शेख रिजवान यांना अटक करीत महाराष्ट्र दारू कायद्यानंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here