चंद्रपूर शिक्षकसेना जिल्हाप्रमुख नायडू यांची गडचिरोली संपर्कपदी नियुक्ती

0
336
Advertisements

चंद्रपूर –  कट्टर शिवसैनिक, छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडापटू, चंद्रपूर शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष राजेश नायडू यांची गडचिरोली शिक्षक सेना संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती मा. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या धोरणानुसार, मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख मा. श्री उध्दव साहेब ठाकरे च्या मार्गदर्शनानुसार आणि म.रा. शिक्षकसेना प्रांताध्यक्ष व अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री) मा. श्री ज. मो. अभ्यंकर यांच्या आदेशाने करण्यात आलेली आहे. श्री राजेश नायडू हे मागील 30 वर्षांपासून एकनिष्ठाने शिवसेनेशी जडलेले आहेत. मागील 3 वर्षात त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षक सेना वाढविण्यासाठी अथक परिश्रम केले व हजारो शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावले तसेच उत्कृष्ठ शिक्षकांना व गुणवंत विध्यार्थीयांना पुरस्कृत देखील केले. कोरोना महामारीत हजारो लोकांना अन्न वाटप, आगोदर वृक्षारोपण, पाणपोई, शिक्षकांच्या व समाजाच्या भले साठी आंदोलन इत्यादी अनेक काम श्रीबराजेश नायडू यांनी शिक्षक सेने मार्फत केले. कदाचित याचीच दखल घेऊन ज्या जिल्ह्याचे पालक मंत्री खुद्द श्री एकनाथ शिंदे साहेब आहेत त्या जिल्ह्यात शिक्षक सेना उभारणी आणि वाढविण्यासाठी श्री राजेश नायडू यांना संपर्क प्रमुख सारखा महत्वपुर्ण पद देण्यात आलेला आहे.
या करिता सर्व स्तरावर शिवसेना चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजेश नायडू याना अभिनंदन करून शुभेच्छा देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here