कावीळग्रस्त युवतीवर 68 वर्षीय वृद्धाने केला अत्याचार

0
1752
Advertisements

भद्रावती – कावीळ झालेल्या 32 वर्षीय युवतीवर 68 वर्षीय इसमाने उपचाराच्या नावाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
शहरातील दरबान सोसायटी मध्ये राहणारे 68 वर्षीय रामनारायण अंबिकाप्रसाद वाजपेयी हा अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक पद्धतीने नागरिकांचे उपचार करण्याचे काम करतो.
सुमठाणा निवासी 32 वर्षीय युवतीची तब्येत खराब झाल्याने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, त्या युवतीची तपासणी केली असता युवतीला कावीळ झालं असल्याचं अहवालात निष्पन्न झालं.
नंतर काही दिवसांनी शहरातील दरबान सोसायटी मध्ये राहणारे 68 वर्षीय वाजपेयी हे आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करतात व त्यांच्या उपचाराने अनेक व्यक्ती बरे झाले असल्याची माहिती त्या युवतीला मिळाली असता ती सुद्धा त्यांच्याकडे कावीळचं निदान करण्यासाठी गेली.
पहिल्या दिवशी वाजपेयी यांनी तिला मालिश करण्याचा सल्ला दिला नंतर दुसऱ्या दिवशी अचानक त्याने त्या युवतीला पूर्ण कपडे काढा असे सांगितले असता ती युवती घाबरली मात्र तो उपचाराचा 1 भाग आहे असे वाजपेयी यांनी सांगितले असता युवतीने अंगावरचे संपूर्ण कपडे काढले असता वाजपेयी यांनी जबरदस्ती त्या युवतीवर अत्याचार केला.
पीडित युवतीने याबाबत घरी जाऊन घरच्यांना संपूर्ण माहिती दिली असता त्यांनी तात्काळ भद्रावती पोलीस स्टेशन गाठत वाजपेयी यांच्यावर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी आरोपीला अटक करीत त्याला न्यायालयात हजर केले व आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुनील सिंग पवार करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here