चंद्रपूर – राज्यात कोरोना विषाणूमुळे मार्चनंतर सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या आज राज्याचा बाधितांचा आकडा लाखोंच्या वर गेला आहे.
आता तर कोरोनाची दुसरी लाट येऊ घालत आहे व आता तर 23 नोव्हेम्बरपासून प्रशासन शाळा सुरू करण्याची घाई करीत असताना पूर्व तयारी म्हणून शिक्षकांची कोरोना चाचणी करीत आहे.
शिक्षक सुद्धा कोरोनाच्या संपर्कात आल्याने त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शाळेत किती शिक्षक असणार यावर तरी सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 4 हजार 300 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून आतापर्यंत तब्बल 34 शिक्षकांसाहित कर्मचारी सुद्धा कोरोना बाधित झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 9 वी ते वर्ग 12 वी च्या माध्यमिक शाळा सुरू करण्याची जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे.
जिल्ह्यात एकूण माध्यमिक शाळांची संख्या ही 1 हजार 616 आहे त्यापैकी 566 शाळा सूर करायच्या आहेत.
दिवाळी असल्याने शिक्षक सुद्धा बाहेरगावी कुटुंबासाहित गेले आहे, आता सरकारचा निर्णय घाईत झाल्याने शिक्षकांची कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली, 1 महिन्याधी पासून शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याची सुरुवात केली असती तर आज चित्र काही वेगळे असते मात्र प्रशासन सर्व निर्णय वेळेवर घेत असल्याने पालकांची सुद्धा चिंता वाढली आहे.
9 वी व 12 वी वर्गातील विद्यार्थ्यांची सुरू होणार शिक्षणवारी मात्र कोरोनाचं आला शिक्षकांच्या दारी
Advertisements