भाजप जिल्हाध्यक्ष भोंगळे यांच्या वाढदिवशी अनेक विक्रम

0
428
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता

घुगूस – भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवशी एकाच दिवशी विक्रमी 1007 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
जिल्ह्यातील विविध तालुक्यात भोंगळे यांच्या वाढदिवशी घुगूस येथे 719, भद्रावती 61, वरोरा 35, कोरपना 116 तर पोम्भूर्णा येथे 76 असे एकूण 1007 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान सहित चंद्रपूर शहरात सेवा शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले, ज्यामध्ये जनधन खाते, पोस्टाच्या योजना, मोफत आधारकार्ड दुरुस्ती तथा अपडेट, राशनकार्ड, सुकन्या योजना, नवीन मतदार कार्ड, प्रधानमंत्री जीवनज्योति योजना असे अनेक उपक्रम भोंगळे यांच्या वाढदिवशी राबविले गेले.
मागील 16 वर्षांपासून भोंगळे यांच्या वाढदिवसाला रक्तदान शिबिराचे आयोजन होत आहे.
राज्यात सध्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका सुरू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर घेऊन युवकांना हेल्मेट व वॉटर कॅन चे आमिष देऊन भोंगळे यांनी आदर्श आचारसंहितेंच उल्लंघन केलं आहे असा आरोप कामगार नेते सय्यद अनवर यांनी केला आहे याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती अनवर यांनी दिली.
घुगूस येथील गांधी चौकात भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त जे कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये कोरोना संसर्गाबाबत कसलीही उपाययोजना केली गेली नाही.
ज्याप्रमाणे विक्रमी रक्तदान करण्यात आले त्याचप्रमाणे घुगूस शहरातील भाजप नेत्यांनी जे कार्यक्रम घेतले ते सर्व कोरोना काळातील सर्व नियम डावलून हा सुद्धा एक विक्रमचं म्हणावा लागेल.
निवडणुकीच्या तोंडावर या प्रकारचे कार्यक्रम घेत नागरिकांना विविध प्रकारचे प्रलोभने देत भाजप नेत्यांनी हे कार्यक्रम पार पाडले.
देशात कोरोनाची दुसरी लाट आली असताना व देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री वारंवार गर्दी न जाण्याचे व मास्क वापरण्याचे सल्ले देत आहे मात्र भाजप नेते ते सर्व नियम डावलून असे कार्यक्रम घेत असल्याने कोरोना पुन्हा डोकं वर करेल यामध्ये कसलीही शंका नाही.

ज्यावेळेस कोरोना आला त्यावेळेस याच भाजप नेत्यांनी नागरिकांचा कोरोनापासून बचाव व्हावा त्यासाठी अनेक जागृतीपर कार्य केले मात्र स्वतः कधी नियम पाळले नाही, म्हणजेच दुसऱ्यास सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशी प्रचिती या नेत्यांनी निर्माण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here