ओबीसी महामोर्च्याला “आप” चा जाहीर पाठिंबा

0
172
Advertisements

चंद्रपूर – संविधान दिनांचे दिवशी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणा-या ओबीसी मोर्चाला आम आदमी पार्टीचे जिल्हा कमेटीचे संपूर्ण समर्थन जाहीर केले असून, पक्षाची ओळख होईल, असे झेंडे, बॅनर किंवा टोपी न लावता, सामान्य ओबीसी नागरीक म्हणून, या मोर्चात सहभागी होण्यांचा निर्णय घेण्यात आला आहे.
जनगणनेत ओबीसीचा स्वतंत्र कॉलम असावा या प्रमुख मागणीसह, ओबीसीच्या अनेक प्रलंबीत मागण्यासाठी ओबीसी समाज सतत आग्रही आहे. मात्र शासन याकडे लक्ष न देता, ओबीसीवर सतत अन्याय करीत आहे, याचा आम आदमी पार्टी निषेध करीत आहे.
52 टक्के ओबीसीचा विकास झाला नाही तर, देशाचा विकास कसा होईल? असा प्रश्नही आम आदमी पार्टीने उपस्थित केला आहे.
आम आदमी पार्टीचे सदस्य,पदाधिकारी, हितचिंतक व कार्यकत्यानी 26 नोव्हेंबरच्या मोर्चात, पक्षाचे ओळख न दाखविता, सहभागी व्हावे असे आवाहन आपचे जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे यांनी आवाहन केले आहे.
ओबिसी मोर्चा कार्यालयात निवेदन देताना
जिल्हाध्यक्ष श्री.सुनिल देवराव मुसळे , महानगर संयोजक राजेश विराणी , जिल्हा सचिव संतोष दोरखंडे ,मीडीया प्रमुख राजेश चेडगुलवार , जिल्हा कोषाध्यक्ष श्री.भिवराज सोनी सचिव महानगर राजु कुडे, कोषाध्यक्ष महानगर सीकंदर सागोरे , शंकर धुमाळे ऑटो संघटना जिल्हाध्यक्ष, मयूर राईकवार माजी संयोजक,श्री.पोटे , संदीप तुर्कयाल झोन 2 संयोजक,रिजवण खान , पंडित गुरुप्रसाद द्विवेदी , गडे प्रसाद तिवारी, मारुती धकाते, भुवनेश्वर निमगडे , बशीर भाई इत्यादि आपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here