देवराव भाऊंची राजकीय कारकीर्द म्हणजेचं “20 टक्के राजकारण, 80 टक्के समाजकारण” – नगरसेवक आसेकर

0
367
Advertisements


गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
आमच्या पक्षाचे लाडके जिल्हाध्यक्ष देवराव भाऊ भोंगळे यांनी आपल्या राजकीय आयुष्यामध्ये 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण केले,अशा आमच्या भाऊंना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो,असे मोलाचे मत कोरपना नगरपंचायतचे नगरसेवक अमोल आसेकर यांनी माजी जि.प.अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबीर कार्यक्रमात व्यक्त केले.
कोरपना येथील श्रीकृष्ण सभागृह येथे शनिवार रोजी “श्री.देवराव दादा भोंगळे मित्र परिवार,युवा मोर्चा व तालुका भाजप” तर्फे देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.जवळपास 116 रक्तदात्यांनी यावेळी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिवती पं.स.उपसभापती महेश देवकते होते तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर यांनी उदघाटन केले.पं.स.सदस्य नूतन कुमार जीवने,सरपंच अरूण मडावी, गडचांदूर भाजप शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार,निलेश ताजने,गडचांदूर न.प.नगरसेवक अरविंद डोहे,नगरसेवक रामसेवक मोरे,जिल्हा सचिव विशाल गज्जलवार,किशोर बावणे, पुरुषोत्तम निब्रड,गडचांदूरच्या माजी नगराध्यक्षा सौ.विजयलक्ष्मी अ.डोहे, कोरपना न.पं. नगरसेवक अमोल आसेकर,पुरुषोत्तम भोंगळे,धानोलीचे सरपंच विजय रणदिवे, हरीश घोरे,संदीप शेरकी,हिरापूर ग्रा.पं.चे माजी सरपंच प्रमोद कोडापे,ओम पवार, दिनेश खडसे, गजानन भोंगळे,यशवंत इंगळे,राकेश राठोड,दिनेश सुर,अनील कवरासे, नारायण कोल्हे, पवन मोहितकर, शंकर चिंतलवार, सुभाष आत्राम,प्रमोद घोटेकर,संदीप टोंगे,गीता डोहे,अल्का रणदिवे,इंदिरा कोल्हे,जगदीश पिंपळकर, प्रमोद पायघन,नामदेव झाडे,पद्माकर धगडी,सुभष आत्राम,अभय डोहे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. रक्तदानाच्या महत्त्वाबद्दल उपस्थित मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले.सदर शिबिराला रक्तदाता,भाजप नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ओम पवार तर आभार संदीप टोंगे यांनी व्यक्त केले.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here