चंद्रपूर – जगात, देशात, राज्यात आणि जिल्ह्यात कोरोनाच्या लाटेत सर्व नागरिक सामावून गेले, श्रीमंत गरीब न बघता या विषाणूने सर्वाना समान न्याय दिला.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाने असाच कहर केला आहे मात्र हा विषाणू जेव्हा कुणाला लागतो व त्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे आज आपल्याला कळणार आहे
जटपुरा गेट परिसरातील नगरसेविका छबु वैरागडे व सामाजिक कार्यकर्ता राजेश बेले यांचा वाद चांगलाच गाजत आहे.
राजेश बेले यांना कोरोनाची लागणं झाल्याने त्यांना एका वसतिगृह मध्ये ठेवण्यात आले होते, त्या काळात त्यांच्या निर्माणाधिन घरावर पालिकेचा बुलडोजर चालला कारण बेले यांनी पालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीचा वापर आपल्या बांधकामात केला.
मात्र त्या कारवाईचा इफेक्ट खूप मोठा झाला, या कारवाई साठी त्यांनी नगरसेविका छबु वैरागडे यांना जबाबदार ठरविले.
त्यानंतर रोज वैरागडे यांच्या विरोधात समाज माध्यमांवर बातम्या व्हायरल होऊ लागल्या, इतकेच नाही तर बेले यांनी त्या कारवाईत महापौर व आयुक्त यांना सुद्धा जबाबदार ठरविले.
नंतर वैरागडे यांनी शासकीय जमिनीवर अवैध बांधकाम केल्याचा ठपका बेले यांनी ठेवला.
त्यात खरं काय आणि खोटं काय हे फक्त राजेश बेले व वैरागडे यांनाच माहिती.
नगरसेविकेचे अवैध बांधकाम पाडणार काय? त्यांचं पद रद्द करणार का? अश्या आशयाच्या बातम्या समाज माध्यमांवर पुन्हा व्हायरल करायला बेले यांनी सुरुवात केली.
मात्र महिला नगरसेविका वैरागडे ह्या किती दिवस स्वतःचा अपमान सहन करणार, त्या नगरसेविका महिलेने दुर्गच रूप धारण करीत त्याबाबत बेले यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या.
जाब विचारण्यासाठी आधी दोघात शाब्दिक बाचाबाचीला सुरुवात झाली नंतर त्याच रूपांतर हाणामारीत झाले.
ह्या हाणामारीत नगरसेविका वैरागडे व त्यांचा मुलगा हे जखमी झाले, सोबतच बेले यांना सुद्धा काही प्रमाणात जखमा झाल्या.
दोघांनी रामनगर पोलीस स्टेशन गाठले, पोलीस सुद्धा त्या दोघांच्या तक्रारीने भांबावून गेले व दोघांवर गुन्हा दाखल करून आपली जबाबदारी पार पाडली.
या प्रकरणी ज्याप्रकारे बेले हे समाज माध्यमांवर वैरागडे यांच्या विरोधात सतत पोस्ट व्हायरल करीत होते हे चुकीचेचं होते.
बेले यांचेवर अन्याय झाला तर कायदा आहे आपल्याकडे त्यांनी कायद्याचा मार्ग अवलंबिला असता पण त्यांनी तसे न करता वैरागडे यांची बदनामी सुरू केली, ज्याप्रमाणे त्यांनी वैरागडे यांच्या विरोधात पोस्ट व्हायरल केल्या त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा सामना करायला हवा होता.
मात्र तसे काही झाले नाही, छबु वैरागडे यांनी सुद्धा कायद्याचा मार्ग अवलंबवायला होता पण अन्याय सहनशीलतेच्या बाहेर गेल्याने त्यांनी रागाच्या भरात बेले यांना जाब विचारला यात ते चुकलेचं.
ओबीसी बांधवांची जनगणना व्हावी यासाठी संविधान दिनी ओबीसी बांधवांचा महामोर्चा निघणार आहे, त्याबद्दलची पूर्व तयारी सुद्धा सुरू आहे, मात्र जटपुरा गेट परिसरात ओबीसी बांधव आपसात भिडले.
अस व्हायला नको होतं, संविधानातील कायद्याचा वापर दोघांनी करायला हवा रस्त्यावर भांडणे आणून काय मिळणार आहे?
भाजप नगरसेविकेने का घेतलं दुर्गेचं रूप?
Advertisements