वर्धा नदीत कसे बुडाले ते 3 मित्र?

0
908
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता

घुगूस – शहरातील अमराई वार्डात राहणाऱ्या 16 वर्षीय प्रचल वानखेडे, पृथ्वीराज आसुटकर व प्रेम गेडाम हे तिघे मुले आज चिंचोली घाटाजवळील वर्धा नदीच्या पात्रात बुडाले, पोलीस त्या तिघांचा शोध घेत आहे.
अमराई वार्डातील आज 12 वाजेदरम्यान 5 मित्र अंघोळीसाठी चिंचोली घाटाजवळ वर्धा नदीच्या पात्रात गेले, मात्र 5 पैकी तिघांचा अंदाज चुकल्याने ते पात्रात बुडाले, आधी 1 जण बुडाला त्याला वाचविण्यासाठी सर्व 4 मित्रांनी नदीत उडी घेतली मात्र दोघेजण कसेबसे स्वतःचा जीव वाचवू शकले.
चिंचोळी घाट हा वाळू तस्करी साठी प्रसिद्ध आहे तस्करांनी वर्धा नदी पात्रातील मोठ्या प्रमाणात वाळू काढून पात्रजवळ मोठे खड्डे निर्माण केले आहे.
ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्या पात्राजवळ वाळू तस्करी सुरू होती मात्र त्यांनी त्या मुलांना वाचविण्याऐवजी तिथून पळ काढला. अनिल गोगल व सुजल वनकर हे दोघे त्यातून बचावले.
3 मित्र वर्धा नदीत बुडाल्याने त्यांच्या परिवारातील सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here