23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू मात्र अनेक जिल्ह्यात शिक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

0
405
Advertisements

ताजी बातमी – 23 नोव्हेंबर पासून वर्ग 9 व वर्ग 12वीच्या शाळा सुरू करण्याबाबत सरकारने निर्णय घेतला परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हे शक्य आहे काय? असे चित्र सध्यातरी कुठे दिसतं नाही आहे.
परंतु शाळा सुरू करण्याआधी शिक्षकांना कोरोना चाचणी करण्याच्या सूचना केल्या आहे, आतापर्यंत अनेक जिल्ह्यात शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शाळा सुरू होणार का यावर सध्यातरी सस्पेन्स कायम आहे.
मुंबई व ठाणे जिल्ह्याला वगळून राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, उस्मानाबाद जिल्ह्यात शिक्षकांच्या कोरोना चाचणीत तब्बल 48 शिक्षक कोरोनाबाधित आढळून आले आहे तर नांदेड जिल्ह्यातील एकाच शाळेतील 11 शिक्षक, औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 15 शिक्षक, बीड जिल्ह्यात 25 शिक्षकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शाळा सुरू होणार की नाही याबाबत सध्यातरी सरकारच्या मनात प्रश्न उपस्थित झाला आहे.
23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थगित करावा अशी मागणी मराठा शिक्षक संघाने केली आहे, सध्यातरी कोरोना हा कमी झाला नसून ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवावे अशी मागणी या शिक्षक संघाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here