Advertisements
राजुरा – जिल्ह्यात सर्वत्र सीसीआय ची कापूस खरेदी सुरु झाली आहे, आज राजुरा तालुक्यातील तुलाना येथील सीसीआय सेंटरला पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज जी अहीर यांनी भेट दिली. यावर्षी कापसावर आलेल्या रोगामुळे काही प्रमाणात अपरीपक्व (कवडी) कापूस शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणावा लागत आहे, या कापसाच्या खरेदीसाठी सीसीआय ला संमती प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना संबंधित ग्रेडर व अधिकाऱ्यांना ला केल्या व या परवानगी साठी केंद्र सरकारला विनंती करणार असे आश्वासन दिले. याही कापसाची हमीभावाने खरेदी झाली पाहिजे अशी भावना व्यक्त केली. जिल्ह्यात कापसाची खरेदी सुरु झाली व हमीभावाने कापूस विकल्या जाणार असल्याने शेतकर्यांमध्ये आनंद दिसून येत आहे. यावेळी सोबत श्री खुशाल बोन्डे, माजी आमदार सुदर्शन निमकर, राजू घरोटे, सचिन डोहे यांची उपस्थिती होती.