स्टेट बँक ऑफ इंडीयात बंपर भर्ती

0
674
Advertisements

ताजी बातमी – देशातील सर्वात मोठी अग्रगण्य स्टेट बँक इंडिया मध्ये राज्य व विविध जिल्ह्यातील शाखेत अप्रेंटिस पदासाठी बंपर भरती निघाली आहे.
देशातील विविध राज्य व जिल्ह्यात आपलं भव्य जाळं पसरविणाऱ्या बँकेत 8 हजार 500 जागा निघाल्या आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज 10 डिसेंम्बर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, उमेदवाराचे वय 20 वर्षे ते 28 वर्ष असावे, राखीव उमेदवारांना सवलत राहणार आहे.
बँकेचे अधिकृत संकेतस्थळ sbi.co.in वर करायचा आहे.
उमेदवारांची निवड ही ऑनलाईन लिखित व स्थानिक भाषेच्या आधारे केली जाईल.
पहिल्या टप्प्यातील ऑनलाईन परीक्षा ही जानेवारी 2021 मध्ये होणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित राज्य व जिल्ह्यात नियुक्ती देण्यात येईल. पहिल्या वर्षी उमेदवारांना स्टायपंड 15 हजार दुसऱ्या वर्षी 16 हजार 500 तर तिसऱ्या वर्षी 19 हजार रुपये मिळणार आहे.
तरीही जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here