गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना येथील अल्पसंख्यांक समाजाचे पत्रकार,संपादक मोहब्बत खान यांना काँग्रेसचे विजय बावणे यांनी भ्रमणध्वनीवर अश्लील भाषेत शिवीगाळ करत “तेरे घर मे घुस के मारूंगा” म्हणत क्षणभरातच बावणे यांनी त्याच्या 7,8 समर्थकांसह मोहब्बत यांच्या घरात घुसले.काही न विचारता शिवीगाळ करत मारपीट सुरू केली.त्यावेळी वाचविण्यासाठी धावून गेलेल्या मोहब्बतच्या बहीण व म्हाताऱ्या आईला ओढत ढकलून खाली पाडले.याला काँग्रेस नेत्याची दबंगगिरी व अल्पसंख्याक विरोधी भुमिकाच म्हणावे लागेल असे मत व्यक्त होत आहे.
हा प्रकार थांबला नाही तर आपल्या पद्धतीने योग्य आणि चोख उत्तर देऊ असा इशारा MIM चे शौकत अली,टिपू सुलतान फाऊंडेशनचे शहाबाज़ अली,अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मोबीन बेग यांनी कोरपना येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.सदर घटनेमुळे गावातील वातावरण तापले असून अल्पसंख्याक समाजात संतापाची लाट उसळल्याचे चित्र पहायला मिळत आहे.काँग्रेस नेते विजय बावणे यांच्या मुजोरी व मनमानी कारभारावर वरिष्ठ नेत्यांनी त्वरित अंकुश लावावा,हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा खणखणीत इशारा संबंधितांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
काँग्रेस नेत्याचं खरं रूप उघड…!
Advertisements