निवडणुकीपूर्वीच वातावरण टाईट……!

0
838
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी येत्या काही महिन्यात नगरपंचायतीच्या निवडणुका होणार असून याच श्रेणीत कोरपना न.पं.सुद्धा आहे. निवडणुक म्हटले की एकमेकांवर आरोप प्रत्यारोप,टिका टिप्पणी,वादविवाद असायचेच.

मात्र कोरपना येथे काहीसा वेगळाच प्रकार घडला आहे.याठिकाणी राजकारण्यांमध्ये “मोबाईल मॅसेज” वरून पेटलेला वाद चक्क पोलिस स्टेशन पर्यंत पोहचला आहे.दोन्ही गटांच्या तक्रारी नंतर शेवटी पोलिसांनी 18 नोव्हेंबर रोजी विवीध कलमानुसार परस्परांवर गुन्हे दाखल केले आहे.
सविस्तर असे की,16 नोव्हेंबर रोजी एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर चॅटिंग करताना कोरपना येथील सीडीसीसी बँकेचे संचालक तथा स्थानिक नगरपंचायत स्वीकृत सदस्य विजय बावणे,नितीन बावणे,सुनील बावणे,नगरपंचायत उपाध्यक्ष मनोहर चन्ने,स्वप्निल गाभणे,पियुष कावळे तसेच कोरपना येथील पत्रकार तथा एका पक्षाचे तालुकाध्यक्ष मोहब्बत खान यांच्यात जुंपली.एका गटाने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बाबतीत निंदनीय व टीकात्मक मजकूर पोस्ट केला.तर प्रतिउत्तर म्हणून पत्रकार तथा एका पक्षाचे तालुकाध्यक्ष “मोहब्बत खान” या दुसऱ्यांनी स्थानिक नगरपंचायत मधील गैरव्यवहार व भोंगळ कारभारांविषयी मजकूर पोस्ट केला. यासर्व घडामोडीनंतर विजय बावणे यांनी भ्रमणध्वनीवरून मोहब्बत खान यांना अश्लील शिवीगाळ केली. याची आडिओ क्लिप सुद्धा वायरल झाली आहे.विजय बावणे यांनी समर्थकांसह मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारपीट केली,बहीन व आईला धक्काबुक्की केली,आरडा ओरडा झाल्याने शेजारी पाजारी जमा झाले आणि या लोकांनी पळ काढला अशी माहिती संबंधितांकडून मिळाली आहे. यानंतर खान यांनी पोलिस स्टेशन गाठून घडलेल्या प्रकाराची तक्रार दिली असता पोलिसांनी भादवी कलम 147,148,149, 506, 507, 294, 323, 452 अन्वये गैर अर्जदारांवर गुन्ह्यांची नोंद केली आहे.
दरम्यान कोरपना न.पं.च्या माजी अध्यक्षा,विद्यमान सदस्या,विजय बावणे यांच्या पत्नी सौ.नंदाताई बावणे यांनी सैय्यद आबीद अली,सैय्यद सुहेल अली,नगरसेवक अरूण डोहे,नगरसेवक अमोल आसेकर,मोहमत सत्तार खान पठाण,शारीक मोसीम अली, नितीन मुसळे,शहबाज अली,अमोल टोंगे, प्रमोद घोटेकर,अतूल आसेकर यांनी संगणमत करून नितीन बावणे,सुनील बावणे,यांना काठीने मारहाण केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली.147,148, 149,507,452, 506,323 भादवी प्रमाणे गैर अर्जदारांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला व पुढील तपास सुरू असून घडलेल्या प्रकारामुळे खान यांचे परिवार दहशतीत वावरत आहे.सदर प्रकार एका मोबाईल मॅसेज वरून सुरू झालं खरं मात्र हे आगामी नगरपंचायत निवडणुकीची नांदी असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.निवडणुकीपुर्वीच जर अशाप्रकारे वातावरण तापत असेल तर निवडणुकीत काय चित्र पहायला मिळेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार हे मात्र नक्की.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here