पदवीधर निवडणूक : चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी आम्ही उठविणारचं – पालकमंत्री वडेट्टीवार

0
1944
Advertisements

चंद्रपूर – पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फेरीला सुरुवात झाली आहे.
भाजप उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ चंद्रपूरला आलेले माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध दारू व वाळू तस्करीबाबत प्रशासनाचा खरपूस समाचार घेतला, जिल्ह्याची दारूबंदी उठविण्याचं पाप तुम्ही करू नका असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी पालकमंत्री वडेट्टीवार यांना लगावला.
बावनकुळे यांच्या आरोपावर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिउत्तर दिले आहे सरकार गेल्याने भाजप नेते वायफळ बडबड करीत आहे, तुम्ही जे आरोप करीत आहात ते सिद्ध करून दाखवा, ही दारू तस्करी तुमच्या सरकारच्या कार्यकाळात बंद होती काय?
वाळू तस्करीत भाजपचे नेते सामील होते काय? माहिती न घेता चुकीचे आरोप हे भान नसल्याशिवाय करीत आहेत, अवैध दारू रोखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहो, पण ही दारूबंदी हटवावी आम्ही या विचाराचे आहोत, लवकर ही बंदी जिल्ह्यातून हटणार, रेती तस्कर तर तुम्ही आहात तुमचे कोराडी मध्ये काय धंदे होते हे सर्वांना माहीत आहे, विधानसभेत तुमचं तिकीट का कापलं हे तर तुम्ही जाणता.
असे वायफळ बडबड करू नका, निवडणूक आली की खोटे आरोप करणे हेच काम भाजपकडे शिल्लक आहे.
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजप व कांग्रेस अवैध धंद्यावर समोर आले परंतु पदवीधरांच्या समस्या नेमक्या काय यावर हे नेते कधी बोलणार देवचं जाणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here