नागपूर – पदवीधर निवडणुकीत एकूण 19 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे, निवडणुकीत एकूण 31 उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता त्यापैकी 7 जणांनी आपले अर्ज मागे घेतले तर 5 जणांचे अर्ज अपात्र झाले.
नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ मोठा असल्याने उमेदवारांना प्रचार करण्यासाठी चांगलीच दमछाक होणार आहे.
भाजपने उमेदवार बदलत नागपूर पालिकेचे महापौर संदीप जोशी यांना संधी दिली तर कांग्रेसकडून अभिजित वंजारी व विदर्भवादी नितीन रोंघे या मैदानात उतरले आहे.
भाजपकडून संदीप जोशी तर अपक्ष संदीप रमेश जोशी असे 2 उमेदवार एकाच नावाचे असल्याने भाजपला काही प्रमाणात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत यंदा विदर्भवादी पूर्ण ताकदीनिशी नितीन रोंघे यांच्या पाठीशी उभे आहे त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
1 डिसेंम्बरला मतदान होत असून 3 डिसेंम्बरला नागपूर पदवीधर मतदार संघाचा नवीन आमदार कोण हे कळेलच.
नागपूर पदवीधर निवडणुकीत तिरंगी लढत
Advertisements