शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन कार्यक्रमात नगरसेवकाला आले हसू

0
1288
Advertisements

चंद्रपूर – हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्यातील बलाढ्य नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
चोख प्रतिउत्तर, प्रबोधनकार, व्यंगचित्रकार म्हणून त्यांची ओळख होती.
17 नोव्हेंबर 2012 ला त्यांचं मुंबईत निधन झाले, आज त्यांचा स्मृतिदिवस म्हणून राज्यभर त्यांच्या चाहत्यांनी व शिव सैनिकांनी त्यांना आदरांजली दिली.
प्रत्येक शिवसैनिकांच्या हृदयात आज बाळासाहेब जिवंत आहे, परंतु चंद्रपुरात मात्र हे उलटंच.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी चंद्रपूर शहरातील तुकुम येथे आदरांजली कार्यक्रम घेण्यात आला मात्र आदरांजली देताना शिवसेना नगरसेवक सुरेश पचारे यांना स्वतःचे हसू आवरता आले नाही.
एकीकडे बाळासाहेबांच्या नावावर निवडणूक जिंकायची तर दुसरीकडे मात्र त्यांच्या आदरांजली कार्यक्रमात गंमत करायची ही शिवसेनेची संस्कृती आहे का?

इतकेच नव्हे तर हे फोटो समाज माध्यमांवर सुद्धा टाकण्यात आले, राज्यात सेनेने भाजप सोबत संबंध तोडले असले तरी चंद्रपूर मनपात मात्र शिवसेना नगरसेवक भाजपसोबत आहे हे विशेष.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here