आमदार किशोर जोरगेवार यांची प्यार फाउंडेशनला भेट

0
283
Advertisements

चंद्रपूर –  पाळीव तसेच वन्य प्राण्यांच्या उपचारासाठी काम करत असलेल्या प्यार फाउंडेशनला भेट देत तेथील गौमातेची पुजा करुन आमदार किशोर जोरगेवार यांनी दिवाळी साजरी केली. यावेळी प्यार फाउंडेशनचे संचालक देवेंद्र रापेल्ली, डाॅ. पूशोत्तम कडुकर, शितल दूर्गे, नूतन कोलावार, मोहन रेड्डी, सिध्दांत चौधरी, अभिषेक हनुमंते,  यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, राशीद हुसेन, बबलू मेश्राम, दिनेश इंगळे आदिंची उपस्थिती होती.

प्यार फाउंडेशनच्या वतीने मोकाट  व आजारी प्राण्यांच्या उपचार व देखभालीचे काम केल्या जात आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी या कामासाठी संस्थेला जागा उपलब्ध करून दिली आहे. सुरवातीला काही मोजके प्राणी येथे होते. मात्र आता प्यार फाउंडेशनचे काम विस्तारले असून येथे आज विविध प्रजातींच्या शेकडो प्राण्यांवर उपचार करुन त्यांची देखभाल केली जात आहे. दरम्याण दिवाळीचे औचित्य साधत आमदार किशोर जोरगेवार यांनी येथे भेट दिली. यावेळी येथे उपचाराकरीता आलेल्या प्राण्याची  आ. जोरगेवार यांनी पाहणी केली. तसेच येथील  गौमातेची पुजा  करुन अनोख्या पध्दतीने दिवाळी साजरी केली. विशेष म्हणजे प्यार फाउंडेशच्या वतीने सुरु असलेल्या या कौतुकास्पद कार्यास आ. जोरगेवार यांच्या वतीने वेळोवेळी शक्य ती मदत केल्या जात असते. पूढेही या समाजकार्यात आवश्यक ती मदत करण्याचे यावेळी आ. जोरगेवार यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here