वीजबिल माफी मिळणार नाही – नितीन राऊत, उर्जा मंत्री

0
348
Advertisements

मुंबई – वीज वापरली तितकेच बिल आले पाहिजे, कोणाचे वीज कनेक्शन कट होणार नाही. योग्य बिल नसले तर त्याची तक्रार करावी मीटर पाहणी केली जाईल. राज्यात बिल सवलत याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकार कडे पाठवण्यात आला आहे. केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी केली पण केंद्र सरकारने मदत केली नाही. वीजबिल सवलत तुर्तास मिळेल असे वाटत नाही.

महावितरणने २४ तास वीज उपलब्ध केली. लोकांनी वीज वापरली त्याचे बिल भरावे. आणि वसुलीच्या संबंधित जो विषय आहे, त्यावर आम्ही असं म्हणालो की आम्ही सुद्धा वीज ग्राहक आहोत. आम्हाला सुद्धा पैसे द्यावे लागतात. जी वीज वापरली आहे त्याचे पैसे देणे गरजेचे आहेत.

Advertisements

लॉकडाउन काळात अनेकांचे रोजगार बुडाले, नागरिक घरी असल्याने विजेचा भरपूर वापर करण्यात आला मात्र वाढीव वीज बिलाचा शॉक जेव्हा नागरिकांना बसला त्यावेळी त्या बिलातून काही प्रमाणात सवलत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली मात्र ऊर्जा मंत्री राऊत यांनी आता कुणालाही वीज बिलात सवलत मिळणार नाही असे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे आम्ही वीजबिल वसुलीचा आदेश काढला आहे. यामध्ये कोणाचीही वीज कापली जाणार नाही. कोणालाही त्रास दिला जाणार नाही. ज्याचे बिल वापरापेक्षा जास्त आलेले आहेत. त्याचे वीजबिल तपासणीचे आदेश अगोदरच दिलेले आहेत. जर त्यांचे बिल योग्य असेल तर तीन हफ्ते करून देण्यास सांगितले आहे. ज्यांनी एकदम बिल भरले आहे त्यांना 2 टक्के सवलत देण्यास सांगितले आहे.

महावितरण वर 69 हजार कोटींचे कर्ज आहे, आम्ही कर्ज काढून कामकाज करीत आहो, अजून किती करणार? असा प्रश्न राऊत यांनी यावेळी उभा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here