पदवीधर निवडणूक 2020 माजी पालकमंत्री पात्र तर विद्यमान पालकमंत्री अपात्र

0
1838
Advertisements

चंद्रपूर – पदवीधर मतदार संघातील यंदाची निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे, भाजपकडून संदीप जोशी तर कांग्रेस तर्फे अभिजित वंजारी आपले नशीब आजमावीत आहे.
नागपूर महानगरपालिका महापौर संदीप जोशी हे बीकॉम तर वंजारी यांचं शिक्षण एलएलबी पर्यंत झालेल आहे.
नागपूर विभागातील पदवीधर मतदारांची संख्या ही एकूण 2 लाख 10 हजार इतकी असून सर्वात जास्त 38 हजार पदवीधर मतदार हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहे.
मात्र ज्यांच्याकडे प्रचाराची धुरा आहे ते या मतदानासाठी पूर्णपणे अपात्र आहे, यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचं शिक्षण दहावी पर्यंत तर खासदार धानोरकर हे बीए प्रथमवर्षं, आमदार धानोरकर बीए प्रथमवर्षं, आमदार बंटी भांगडीया मुक्त विद्यापीठ प्रथमवर्षं, आमदार किशोर जोरगेवार दहावीच्या पुढे जाऊ शकले नाही.
हे तर झाले मतदानापासून अपात्र जिल्ह्यातील फक्त दोनच आमदार या मतदानाचे पात्रधारक ठरले आहे यामध्ये जिल्ह्यातील उच्चशिक्षित असलेले भाजपचे आमदार म्हणजेच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार त्यांच्याकडे विविध अभ्यासक्रमाच्या पदव्या आहे तर दुसरे कांग्रेसचे आमदार सुभाष धोटे हे कला शाखेतील पदवीधर आहे.
सध्या कांग्रेसचे खासदार धानोरकर, आमदार धानोरकर व पालकमंत्री विजय वडेट्टीवार, भाजपचे आमदार बंटी भांगडीया व अपक्ष आमदार जोरगेवार यांना फक्त प्रचारक करायचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here