झाडीपट्टी नाटकांना प्रेक्षक मिळणार काय?

0
268
Advertisements

ताजी बातमी – 5 नोव्हेम्बर मराठी रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक क्षेत्र अनलॉक झाले मात्र याबाबतचा शासन निर्णय स्थानिक यंत्रणेपर्यंत पोहचलाच नाही.
नाट्यगृह, चित्रपटगृह व मोकळ्या ठिकाणी होणारे नाटक यांना काही नियमासह परवानगी मिळाली असली तरी सध्या ताळेबंदी आहे की काय असं चित्र सध्या दिसत आहे.
दिवाळीत सुद्धा लोकांचे मनोरंजन करणारे कलावंत मात्र काम नसल्याने घरीच बसले आहे.
नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात झाडीपट्टी रंगभूमीला वेगळेच महत्व आहे, ग्रामीण भागात या लोक संस्कृती मुळे जणू जत्रेच स्वरूप येत असते.
पूर्व विदर्भात झाडीपट्टी क्षेत्रातील कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांची एकूण संख्या जवळपास 500 च्या घरात आहे, प्रत्येक आयोजन समितीमध्ये 10 कलावंत असतात.
दिवळीपासून मार्च महिन्यापर्यंत या लोक संस्कृतीचे आयोजन मोठ्या प्रमाणात होत असते, मात्र कोरोना काळात सर्व कलावंतांना या विषाणूने घरी बसविले, त्यामुळे अनेक कलावंतांनी भाजीपाला विक्री व मजुरी करून कसाबसा परिवाराचा उदरनिर्वाह केला मात्र आता सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी मिळाली असून सुद्धा परवानगी मध्ये अजूनही स्पष्टता नसल्याने कलावंतावर उपासमारीची पाळी आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here