खड्ड्यांविरोधात बल्लारपूर युवक कांग्रेसचे अनोखे आंदोलन

0
357
Advertisements

बल्लारपूर – बल्लारपूर शहरातील लोकमान्य टिळक, सुभाष वॉर्ड व भगतसिंग वार्डातील मार्गावर अनेक खड्डे निर्माण झाले आहे.
वार्डातील मुख्य मार्गाच्या या अवस्थेमुळे नित्य दुर्घटना होत आहे, त्यामुळे नागरिकांनी यासंदर्भात अनेक आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुद्धा केला परंतु त्याचा काही फायदा झाला नाही.
याउलट बल्लारपूर नगरपरिषद व वेकोली यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे सुरू केले आहे, ते तिन्ही वॉर्ड वेकोली क्षेत्रात येत असल्याने मार्गाची दुरुस्तीचे काम हे वेकोलीचे आहे असे नगर परिषदतर्फे नागरिकांना सांगण्यात येत आहे तर वेकोली तर्फे हे काम पालिकेचे आहे असे स्पष्ट करीत असून आपले हात वर करीत आहे.
या आरोप प्रत्यारोपात युवक कांग्रेसच्या वतीने अनोखे आंदोलन करीत वेकोली व पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
युवक कांग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टिळक वॉर्डातील मार्गावर ज्या ठिकाणी खड्डे आहे त्या खड्ड्याच्या सभोवताल दिवे लावत दिवाळी साजरी करण्यात आली.
यावेळी युवक कांग्रेस अध्यक्ष चेतन गेडाम, सुनील मोतीलाल, रुपेश रामटेके, गोपाळ कलवाला, शंकर महाकाली, रोहित पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here