ताजी बातमी – देशातील महत्वाचा सण म्हणजे दिवाळी, दिवाळी आली की नागरिकांची तयारीची लगबग सुरू होते, दिवाळी आली की फराळ, मिठाई येतेच परंतु यंदाच्या दिवाळी सणात मिठाई ऐवजी नागरिकांनी सुका मेव्यावर जास्त पसंती दिली आहे.
मागील 10 दिवसांपासून दिवाळीच्या काळात तब्बल 3 हजार 700 टन सुका मेव्याची विक्री झाली असून 1 हजार 400 टन काजूची विक्री झाली आहे.
यंदा ड्रायफ्रूटचे दर सुद्धा मागच्या वर्षीच्या तुलनेत खाली घसरले आहे, मागील वर्षी 800 रुपये किलो विकल्या जाणाऱ्या काजूचे दर यंदा 450 रुपये किलोपर्यंत पोहचले.
या कालावधीत तब्बल 140 कोटींचा सुका मेवा विकल्या गेला आहे.
कार्यालय, कंपनी व राजकीय पदाधिकारी यांनी सुका मेव्याला पसंती देत आपल्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली.
देशात चिनी मालावर बहिष्कार असून सुद्धा शिल्लक असलेला चिनी माल बाजारात सर्रासपणे विकल्या जात असल्याने सध्या 60 टक्के चिनी माल व 40 टक्के भारतीय बनावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहे.
दिवाळीत यंदा मिठाईऐवजी नागरिकांची सुका मेव्याला पसंती
Advertisements