कोरोना काळातील वाढीव वीज बिलात सवलतीची शक्यता मावळली

0
279
Advertisements

ताजी बातमी – कोरोना काळातील नागरिकांना आलेलं वाढीव भरघोस विजबिलात सवलत मिळणार नसल्याचे संकेत महावितरणने दिले आहे.

महावितरणने याबाबत परिपत्रक काढून वीज बिल वसूल करण्याचे निर्देश व नागरिकांना आलेल बिल योग्य आहे हे पटवून देण्याचं आवाहन महावितरणने कर्मचाऱ्यांना दिल आहे.

Advertisements

वीज बिल वसुली मेळावे, वीज ग्राहकांना टप्प्या टप्प्याने बिल भरण्याची मुभा तसेच एकावेळी तोडगा काढून वीज बिल भरणे ग्राहकांना शक्य होणार आहे.

कोरोना काळात वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यास कर्मचाऱ्यांनी कुठलीही कसर सोडली नाही, त्या काळातील वीज कर्मचाऱ्यांच योगदान ग्राहकांच्या निदर्शनास आणून द्यावे, सध्या महावीतरणवर खर्चाचा डोंगर उभा आहे यासाठी ही वीज बिल वसुली आवश्यक आहे अन्यथा ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा मिळण्यास कठीण जाणार असल्याचेही त्या परिपत्रकात नमूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here