कारागृह परिसरात व एस वर्कशॉप चौकात बिरसामुंडा जयंती साजरी

0
236
Advertisements

चंद्रपूर –  महानगर भाजपाच्या वतीने भगवान बिरसामुंडा जयंतीचे औचित्य साधून भगवान बिरसामुंडाला आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन एस टी वर्कशॉप चौक व जिल्हा कारागृह परिसरातील स्मारक येथे रविवार (१५ नोव्हेंबर)ला करण्यात आले.
यावेळी अध्यक्षस्थानी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,महामंत्री राजेंद्र गांधी, सुभाष कासंगोट्टूवार, रवींद्र गुरनुले, नगरसेवक शिला चव्हाण,ज्योती गेडाम, चंद्रकला सोयाम,शीतल कुलमेथे,माया उईके,धनराज कोवे,गणेश गेडाम(उपाध्यक्ष)रामकुमार अकापेलिवार, देवानंद कंनाके, सोपान वायकर,राकेश बोमावार, पुरुषोत्तम सहारे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ मंगेश गुलवाडे म्हणाले,बिरसा मुंडा चा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ ला विद्यमान झारखंड राज्यातील राची जिल्ह्यात उलिहातु या गावात झाला. त्यांच्या आईचे नाव करमी हातू ,तर वडिलांचे नाव सुगना मुंडा असे होते.
बिरसा मुंडा अभ्यासात हुशार होते.शाळेत प्रवेश घ्यायला त्यांचे नाव बिरसा डेव्हिड ठेवले,पण ते इंग्रजा विरुद्ध उभे राहिले,आणि धर्म परिवर्तन चा विरोध करीत आदिवासी संस्कृतीच्या रक्षणासाठी जनजागृती केली.लोकांना अंधविश्वासातून बाहेर काढले.१८८२ फॉरेस्ट ऍक्ट आला तेव्हा,आदिवासींचे जमिनीवरील हक्क हिरावल्या गेले.

बिरसा मुंडाने उलगुलांन आंदोलन छेडून,जल-जमीन-जंगल वर आदिवासींची दावेदारी कायमची आहे,हे सिद्ध करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.त्यामुळे आदीवासी क्षेत्र व राज्य नेहमी इंग्रजांपासून स्वतंत्र होते.
त्यांच्या संघर्षशील वृत्तीने आदिवासी बांधवांना न्याय मिळाला व त्यांना लोकांनी भगवान म्हणून स्वीकारले. क्रांतिवीर भगवान बिरसामुंडा यांचा आदर्श नवीन पिढीने जोपासावा असे आवाहन त्यांनी केले. सुभाष कासंगोट्टूवार यांनी संचालन व आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला शेकडो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. भगवान बिरसामुंडा च्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here