Advertisements
घुगूस – वेकोलीत कार्यरत युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घुग्गुस शहरात घडली आहे.विनोद नामदेव कोल्हेकर असे मृत युवकाचे नाव आहे.
मृतक वेकोलीच्या निलजई टू खाणीत कार्यरत होता. या घटनेची माहिती घुगुस पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नसून पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.