Advertisements
गोंडपीपरी:- वन्यजिवांपासून शेतपिकांचे संरक्षण करण्यासाठी शेती सभोवताल पसरविलेल्या जिवंत विद्युत ताराला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथे आज सकाळी उघळकीस आली. साईनाथ मेश्राम (42) असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून नेहमी प्रमाणे शेतात पाणी करण्यासाठी गेला होता. ऐण दिवाळी सणाचा दिवशी ही दुदैवी घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.