शासकीय मुलांच्या निरीक्षणगृहात बालक दिनाचे आयोजन

0
213
Advertisements

चंद्रपूर – मुलांची काळजी व संरक्षण करणारी शासकीय मुलांचे निरीक्षणगृह/बालगृह शास्त्रीनगर येथे 14 नोव्हेम्बर रोजी बालक दिन साजरा करण्यात आला.
भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
आयोजित कार्यक्रमात निरीक्षणगृहातील परिविक्षा अधिकारी निलेश जक्कुलवार, सचिंद्र नाईक यांनी उपस्थितांना बालकांचे हक्क, अधिकार, शिक्षण पुनर्वसन व बालक दिनाचे महत्व पटवून दिले.
यावेळी उपस्थित बालकांनी सुद्धा गायन व आपले मनोगत मान्यवरांसमोर व्यक्त केले.
अल्पोहाराने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
आयोजित बालक दिन कार्यक्रमात संस्थेचे कर्मचारी राकेश खोटे व सामृतवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here