अखेर संप टळला, वीज कर्मचारी, अधिकाऱ्यांची दिवाळी होणार गोड

0
218
Advertisements

ताजी बातमी – ऊर्जा विभागातील कर्मचाऱ्यांना अखेर बोनस जाहीर करण्यात आला आहे. महावितरण, महापारेषन व महानिर्मितीतील १ लाख कर्मचाऱ्यांना बोनस देण्यास ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांची तत्वतः मंजुरी दिली आहे. बोनस जाहीर झाल्याने वीज कर्मचाऱ्यांचा ऐन दिवाळीतील संभाव्य संप तूर्तास टळला आहे. त्यामुळे एकप्रकारे महाराष्ट्रावरील वीजसंकटही टळलं आहे.

मागील वर्षी देण्यात आलेली बोनस रक्कम यावर्षी सुद्धा मिळणार आहे, कोरोना काळातील वीज पुरवठा, चक्री वादळात ठप्प झालेली यंत्रणेला मजबूत करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र एक केलं.

Advertisements

अधिकारी व कर्मचाऱ्यांना 15 हजार, विद्युत व उपकेंद्र सहायक यांना 9 हजार रुपये देण्याची घोषणा ऊर्जा मंत्री राऊत यांनी केली आहे.

करोना संकटाच्या काळात अविरत सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी बोनसने गोड व्हायला हवी, अशी मागणी संघटनांकडून करण्यात आली होती. २०१९-२० या आर्थिक वर्षात तिन्ही कंपन्यांनी मिळून ८२ हजार कोटींचा महसूल सरकारला मिळवून दिला आहे. महापारेषणला १३० कोटी तर महावितरणला १५ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. असे असताना १ लाख कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी सरकारकडे १२० कोटी रुपये नाहीत, हे आम्ही मान्य करणार नाही, असे नमूद करत उद्या (शनिवारी) सकाळी ८ वाजल्यापासून संपावर जाण्याचा इशारा तिन्ही कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी हा विषय अधिक चिघळू न देता कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केली असून संभाव्य संपाचे संकटही त्यामुळे टळले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here