चंद्रपूर जिल्ह्यात 7 मृत्यूसह 106 नवे बाधित

0
630
Advertisements

चंद्रपूर, दि. 13 नोव्हेंबर: जिल्ह्यात गत 24 तासात 175 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 106 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्या बाधितामध्ये नागाडा, चिचपल्ली येथील 40 वर्षीय पुरुष, चिचपल्ली येथील 58 वर्षीय महिला, लालपेठ कॉलनी येथील 53 वर्षीय पुरुष, पद्मापूर येथील 81 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील गोविंदपुर येथील 65 वर्षीय पुरुष, घुगुस येथील 46 वर्षीय पुरुष, तर गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 267 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 250, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली आठ, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

Advertisements

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 106 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 17 हजार 484 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 175 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 14 हजार 850 झाली आहे. सध्या 2 हजार 367 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 29 हजार 607 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 10 हजार 700 नमुने निगेटीव्ह आले आहे.

नागरिकांनी बाजारात गर्दी करू नये. मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 106  बाधितांमध्ये 67 पुरुष व 39 महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परीसरातील 40,बल्लारपूर तालुक्यातील एक, चिमूर तालुक्यातील एक, मुल तालुक्यातील 8, गोंडपिपरी तालुक्यातील 4, कोरपना तालुक्यातील 8, ब्रह्मपुरी तालुक्यातील 4, वरोरा तालुक्यातील 8,भद्रावती तालुक्यातील 21, सावली तालुक्यातील एक, सिंदेवाही तालुक्यातील 4, राजुरा तालुक्यातील 6 असे एकूण 106 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील जल नगर वार्ड, तुकुम, पायली भटाळी, बाबुपेठ, ऊर्जानगर, घुगुस,सिव्हील लाईन परिसर, जटपुरा वार्ड, दुर्गापुर, शक्तिनगर, बालाजी वार्ड, उत्तम नगर, रामनगर, घुटकाळा वार्ड, सरकार नगर, निर्माण नगर, नगीना बाग, स्वावलंबी नगर, बंगाली कॅम्प परिसर, पडोली, समाधी वार्ड, सुंदर नगर, तुकडोजी वार्ड भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

चिमूर तालुक्यातील राजीव गांधी वार्ड, वडाळा भागातून बाधित पुढे आले आहे.  मुल तालुक्यातील चक दूगाळा, कन्नमवार वार्ड, वार्ड नंबर 8 परिसरातून बाधित ठरले आहे. सावली तालुक्यातील कापसी भागातून बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील बिबी, गडचांदुर, वैशाली नगर, वनसडी, कन्हाळगाव, भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

वरोरा तालुक्यातील पाझूंर्णी, अभ्यंकर वार्ड, शांतीनगर, सरदार पटेल वार्ड, मालवीय वार्ड, टेमुर्डा, शेगाव भागातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील कपिल वास्तू नगर, देलनवाडी परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील गुरु नगर, ऑर्डनन्स फॅक्टरी चंदा परिसर, आंबेडकर वार्ड, किल्ला वार्ड, घोडपेठ, भंगाराम वार्ड, विजासन रोड परिसर, पंचशील नगर, सुरक्षा नगर, झाडे प्लॉट परिसर, समता नगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

राजुरा तालुक्यातील नगर परिषद वॉर्ड, देशपांडे वाडी, आंबेडकर वार्ड, आदर्श चौक परिसर, निंबाळा भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here