युवती व महिलांकरिता एक वर्षाचे निवासी प्रशिक्षण

0
331
Advertisements

चंद्रपूर : नवगुरुकुल फाउंडेशन फॉर सोशल वेलफेअर, गुरुग्राम, हरियाणा, या संस्थेतर्फे सन 2020-21 करिता सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स फॉर गर्ल्स अँड ट्रान्सवूमन स्टुडन्ट हा केवळ युवती व महिलांकरिता असलेला निवासी प्रशिक्षण कार्यक्रम पुणे येथे राबविण्यात येणार आहे. सध्या 100  प्रशिक्षणार्थी महिला युवतींची नोंदणी पूर्ण झालेली असून उर्वरित शंभर जागा करिता आदिवासी सामाजिक व आर्थिक दृष्ट्या वंचित घटकांमधील 16 ते 25 वर्ष वयोगटातील दहावी पास मुली व महिलांना संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. याकरिता सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निवड प्रक्रियेतील पहिला टप्पा मूलभूत गणित या विषयाची चाचणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर, शासकीय आश्रमशाळा मध्ये दिनांक 24 नोव्हेंबर 2020 रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे.

नवगुरुकुल फाउंडेशन फॉर सोशल वेलफेअर, गुरुग्राम, हरियाणा, ही संस्था सन 2016 पासून सामाजिक व आर्थिक दृष्ट्या वंचित घटकांमधील 16 ते 25 वर्ष या वयोगटातील युवक व युवतीं करिता डिप्लोमा इन सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग हा एक वर्षाचा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम राबवत आहे. प्रशिक्षणोत्तर शंभर टक्के रोजगाराच्या हमीसह प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च सदर संस्था स्वतः करणार आहे.

Advertisements

प्रशिक्षण कार्यक्रमाची निवड प्रक्रिया ही चार टप्प्यात विभागली असून कार्यक्रमाचे स्वरूप, निवड प्रक्रिया, निवड प्रक्रियेतील पहिला टप्पा राबविण्याकरिता आवश्यक कार्यवाही बाबतच्या सविस्तर सूचना व सदर प्रशिक्षणाबाबत अधिक माहिती https:navgurukul.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी, महिला यांनी आपल्या नावाची नोंदणी सदर संकेतस्थळावर दिनांक 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत करावी, असे आवाहन चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

 चिमूर प्रकल्प कार्यालयातर्फे देखील चिमूर, वरोरा, भद्रावती, नागभिड, व ब्रम्हपूरी तालुक्यातील 17 ते 25 वयोगटातील दहावी उत्तीर्ण मुलींसाठी सदरहु संस्थेमार्फत सॉफ्टवेअर इंजिनिअरींग डिप्लोमा कोर्स चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत चिमूर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 07170-265524 या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या उमेदवारांची दि. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वा. शासकीय आश्रमशाळा, जांभूळघाट, ता. चिमूर येथे ऑफलाईन पद्धतीने परिक्षा घेण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थीनींनी नोंदणी करून परिक्षेस उपस्थित रहावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी के.ई. बावनकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here