दिवाळी बोनस द्या अन्यथा संप, 86 हजार वीज कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

0
637
Advertisements

ताजी बातमी – वीज कामगार, अभियंते व अधिकाऱ्यांच्या सर्व 21 संघटनांच्या पदाधिकारी व व्यवस्थापन तर्फे ऊर्जा सचिव व तिन्ही अध्यक्ष, वित्त संचालक यांच्यामध्ये व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे झालेल्या संयुक्त मिटिंग मध्ये दिवाळी बोनस व सानुग्रह अनुदान देण्यासंबंधी महावितरणचे अध्यक्ष आशिष गुप्ता यांनी नकारात्मक भूमिका घेतल्याने सर्व संघटनांनी 12 नोव्हेम्बरपासून राज्यात निदर्शने, द्वारसभा व 14 नोव्हेम्बरला लाईटनिंग स्ट्राईक अटळ निर्णय असल्याचे जाहीर केले.
तब्बल दीड तास चाललेल्या मीटिंगमध्ये 19-20 साली महावितरणला 82 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळवून दिला यामध्ये महावितरणला 150 कोटी तर महापारेषनला 130 कोटींचा नफा मिळून देखील 5 लाख कर्मचारी , अभियंते, अधिकारी यांना 120 कोटि बोनस सानुग्रह अनुदान देण्यासाठी व्यवस्थापनाचा नकार असल्याने सर्व कामगार संघटनांनी एकत्र येत आंदोलन करणार असल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी दिली आहे.
मागील 12 वर्षांपासून वीज कर्मचाऱ्यांना बोनस, सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी देण्यात आला आहे, परंतु यावर्षी व्यवस्थापन नकार देत असल्याने आम्ही 14 नोव्हेंबर पासून संप करीत असल्याची माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here