राजुरा – ट्रॅक्टर अपघातात 17 वर्षीय उमेश पुडलीक सोनूरले याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 12 नोव्हेबर रोजी सकाळी विहिरगाव येथे घडली या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला आहे.
आज सकाळी उमेश सोनूरले हा बकरीला चारा आणण्यासाठी सायकलने मुर्ती कडे जाणाऱ्या मार्गाने जात होता उलट दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टर चालकाच्या निष्काळजीपणात सायकलला धडक बसली त्यात उमेशचा जागीच मृत्यू झाला हे ट्रॅक्टरमध्ये अवैध रित्या रेती भरून आणीत होता या अपघातानंतर नातलग आणि ग्रामस्थानी आरोपीला तात्काळ अटक करून आर्थिक मदत द्यावी ही मागणी करीत असल्याने तणाव आहे विरुर पोलीस घटनास्थळी पोहचले असून तोडगा काढणे सुरू आहे.
विहिरगाव हे अवैध रेती तस्करीचे केंद्र बनले आहे राजरोसपणे या परिसरातील नाल्यातून अवैधरित्या रेती मोठ्या प्रमाणात सुरू आहे मागील महिन्यात सातरी गावाजवळ ट्रॅक्टर अपघातात एकाचा मृत्यू झाला होता.
बकरीला चारा आणणे बेतले जीवावर
Advertisements