दिवाळीत फटाका किरकोळ व्यापाऱ्यांवर आली संक्रांत

0
334
Advertisements

चंद्रपूर – राष्ट्रीय हरीत लवादाच्या आदेशानुसार चंद्रपूर शहर महानगरपालीकेच्या हद्दीत संपुर्ण प्रकाराच्या फटाक्यावर व आतीषबाजीवर पुर्णत: बंदी घालण्यात आली आहे. फटाक्यामुळे मोठ्या प्रमाणात वायु प्रदुषण होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. आपल्याकडे पारंपरिक सण आणि उत्सवांना महत्त्व आहे, मात्र ते साजरे करताना पर्यावरणावर व आरोग्यावर प्रतिकूल परिणार होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.
आतिषबाजी व फटाक्यावर पूर्ण बंदी केल्याने किरकोळ व्यापाऱ्यांच मात्र लाखोंचे नुकसान झाले आहे.
चंद्रपूर मनपाने किरकोळ व्यापाऱ्यांना 2 नोव्हेंबर रोजी फटाक्यांचे दुकान लावण्याची अधिकृत परवानगी दिली मात्र 11 नोव्हेम्बरला मनपा हद्दीत पूर्णतः फटाक्यांवर बंदीचा आदेश काढण्यात आला विशेष म्हणजेच तोंडावर दिवाळीचा सण असताना, एकतर चंद्रपूर मनपाने फटाका किरकोळ व्यापाऱ्यांची थट्टाच केली आहे.
ठोक व्यापाऱ्यांनी फटाके हे किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत पोहचविले मात्र अचानक चंद्रपूर मनपाने हा आदेश काढल्याने फटाका किरकोळ व्यापारी हैराण झाले.
आधीच कोरोनामुळे उद्योग बंद होते मात्र सण जवळ असल्याने तात्काळ फटाके उत्पादन करून हा माल तात्काळ किरकोळ व्यापारी यांच्याजवळ पोहचविला मात्र आता हा आदेश आल्याने किरकोळ व्यापाऱ्यांच्या पोटावर लाथ मारण्याचे काम प्रशासनद्वारे करण्यात आले आहे.

किरकोळ व्यापारी यांनी आपले दुकाने सुद्धा थाटले परंतु मनपाने असा आदेश काढल्याने किरकोळ व्यापारी सुद्धा दंग झाले, आता करायचं काय हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
आधी आपला कर वसुली करायचा मग दुकानासाठी परवानगी देऊन काही दिवसात फटाके बंद असा आदेश काढायचा?
प्रशासन म्हणत आहे की पर्यावरण पूरक होळी साजरी करा, मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अजूनपर्यंत असे पर्यावरण पूरक फटाके कुठेच उपलब्ध नाही आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here