माजी केंद्रीयमंत्री “हंसराज अहीर” यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

0
202
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
जनप्रिय लोकसेवक पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री “हंसराज अहीर(भय्या)” यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इतर ठिकाणांसह कोरपना व गडचांदूर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्राथमिक आरोग्य केंद्र(पीएससी) गडचांदूर येथील आशा वर्कर्स यांना साडी व मिठाईचे वाटप करण्यात आले.यावेळी भाजपचे जेष्ठ नेते महादेवराव एकरे,गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवर,नगरसेवक अरविंद डोहे,नगरसेवक रामसेवक मोरे,गडचांदूर अल्पसंख्याक शहराध्यक्ष अजी़म बेग,महेश घरोटे,शंकर आपुरकर,वैद्यकीय कर्मचारी कांबळे व इतरांची उपस्थिती होती.
कोरपना तालुका भाजपच्या वतीने स्थानिक बसस्थानक चौक व ग्रामीण रुग्णालय येथे हळदी युक्त 101लीटर पौष्टिक दुध वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.भाजपाचे नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष तथा कन्हाळगाव ग्रामपंचायत उपसरपंच नारायण हिवरकर यांच्या हस्ते सदर कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आलेे.यावेळी विशाल गज्जलवार,सरपंच अरूण मडावी,कवडू जरीले,शशिकांत आडकीने,विजय रणदिवे,विजय पानघाटे,ओम पवार, दिनेश खडसे,संजय ठाकरे,सुधाकर मोडक,पद्माकर दगड़ी,सुनील,शंकर चिंतलवार,विनोद कुमरे,दिवाकर गेडाम सह आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. अशाप्रकारे कार्यक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहाने हंसराज भय्या यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here