राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात “इनकमिंग” ची मालिका सुरूच

0
332
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या तालुका जिवती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कार्यकर्ता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.यात जिवती नगरपंचायत मधील अमर राठोड, वसंत राठोड,केशव चव्हाण,शरद चव्हाण या 4 काँग्रेस व भाजपच्या नगरसेवकांनी राकाँ जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,महिला जिल्हाध्यक्षा सौ.बेबीताई उईके,यांच्या नेतृत्वात आणि ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पंकज पवार,ज्येष्ठ नेते सैय्यद आबीद अली,गडचांदूर न.प.उपाध्यक्ष तथा कोरपना तालुकाध्यक्ष शरद जोगी,जिवती तालुकाध्यक्ष कैलाश राठोड,माजी तालुकाध्यक्ष राम चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून शंकर कारभारी,मोहन जाधव,पंडित पवार,रामराव कारभारी, विष्णु नाईक,गोविंद नाईक,भीमराव राठोड,अविनाश नागरगोजे,अविनाश चव्हाण,दिपक केंद्रे,गजानन गायकवाड, गोलू केंद्रे,परमेश्वर चव्हाण,धनराज मोरे, नीलेश राठोड,राहुल राठोड या समर्थकांचा प्रवेश करणार्‍यांमध्ये समावेश असल्याची माहिती राकाँच्या संबंधितांकडून देण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंगची मालिका सुरूच असून पुन्हा कोण आणि केव्हा ! याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे हे मात्र विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here